लाइव न्यूज़
९५ हजाराच्या कर्जापायी शेतकऱ्याची आत्महत्या
Beed Citizen | Updated: February 6, 2018 - 3:44pm
केज
केज तालुक्यातील होळ येथील शेतकरी आबासाहेब गोविंदराव शिंदे (वय ४४) यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीस कंटाळून सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली.
आबासाहेब शिंदे यांनी चार वर्षापूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या होळ येथील शाखेतून ९५ हजारांचे कर्ज घेतले होते. परंतु सततच्या नापिकीमुळे त्यांना हे कर्ज फेडणे शक्य झाले नाही. त्यामुळे हे कर्ज कसे फेडायचे या चिंतेने त्यांना ग्रासले होते. याच विवंचनेतून त्यांनी सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
Add new comment