लाइव न्यूज़
राखेची वाहतुक करणारा ट्रक पलटला; चालक ठार
अंबाजोगाई (प्रतिनिधी) राख घेवून जाणारा ट्रक पलटल्याने झालेल्या अपघात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास गिरवली ते घाटनांदूर रस्त्यावर घडली.
अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे ट्रकला अपघात झाला. ट्रक क्र.(एम.एच०४ डीडी ४४३४) हा राख भरून उमरग्याकडे जात असतांना गिरवली ते घाटनांदूर रस्त्यावर चालकाचा स्टेअरींगवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यालगत खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात जावेद जलालोद्दीन शेख (४०, रा.उमरगा) यांचा जागीच मृत्यू झाला.
Add new comment