लाइव न्यूज़
वडवणीत शिवसेनेचा रास्ता रोको रस्त्याच्या मागणीसाठी मांडला ठिय्या

बीड (प्रतिनिधी) चिंचवण ते चिखल बीड रस्त्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत नवले यांच्या उपस्थितीमध्ये आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रस्त्याच्या मागणीसाठी संतप्त शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले.
वडवणी तालुक्यातील चिंचवण ते चिखलबीड रस्त्याच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी आज वडवणी येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत नवले, युवासेनेचे राज्य सहसचिव विपुल पिंगळे, उपजिल्हाप्रमुख संजय महाद्वार, तालुकाप्रमुख विनायक मुळे, युवराज शिंदे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.
Add new comment