लाइव न्यूज़
डॉ.अशोक थोरात यांच्या प्रयत्नांमुळे सिटीस्कॅन सुविधा उपलब्ध यमुनाई डायग्नोस्टीक सेंटरमधील सुविधेस आरोग्य संचालनालयाची मान्यता

बीड (प्रतिनिधी) येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात सिटीस्कॅन सुविधा उपलब्ध नसल्याने रूग्णांना होणारा त्रास दुर करण्याच्या दृष्टीने शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी आरोग्य सेवा संचालनालयाकडे खाजगी डायग्नोस्टीक सेंटरमधून सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून येथील यमुनाई डायग्नोस्टीक सेंटर यांच्याकडून सुविधा उपलब्ध करून देण्यास आरोग्य संचालनालयाने मान्यता दिली आहे. डॉ.थोरात यांच्या सक्रिय भुमिकेमुळे रूग्णांना माफक दरामध्ये सिटीस्कॅन सुविधा उपलब्ध झाली आहे.
बीड जिल्हा रूग्णालयात कायमस्वरूपी सिटीस्कॅन सुविधा उपलब्ध होईपर्यंत रूग्णांची होणारी गैरसोय पाहता शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी येथील यमुनाई डायग्नोस्टीक सेंटर यांच्याकडून रूग्णालयाच्या स्वीय प्रपंजी खात्यातून दारिद्रय रेषेखालील व एमएलसी रूग्णांच्या तपासण्या करण्याकरीता मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य सेवा संचलनालयाकडे मान्यतेसाठी पाठवला होता. दि.५ फेब्रुवारी रोजी आरोग्य सेवेचे सहसंचालक डॉ.बी.डी.पवार यांनी सदर प्रस्तावास मान्यता देवून यमुनाई डायग्नोस्टीक सेंटरकडून सिटीस्कॅन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
Add new comment