Advertisement

Beed Citizen Daily Marathi News Paper Beed

Beed Citizen Marathi Newspaper,online News Paper in Beed District, Beed Citizen News Paper, News Paper in Maharashtra, Maharashtra Marathi News Paper, Marathi Beed Citizen,Dainik Beed Citizen,Daily News Paper in Beed, Beed Citizen Newspaper Marathwada, Beed Citizen Newspaper First Page,Marathi News Paper of Beed, Beed Citizen Marathi Newspaper Index Page

कुठे शोधताय पन्नाशीनंतरचा विरंगुळा

या घाईगर्दीच्या आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण म्हणत असतो, नाही हो वेळच मिळत नाही !  तर मग जेंव्हा वेळ असेल तेव्हा कोणाला शोधणार ? असेच ना ! जर आंब्याची कोय लावली, तर आंब्याचच झाड उगवेल, ना थोडच चिक्कूचं झाड उगवणार आहे, म्हणजेच जसे पेराल तसेच उगवणार तर मग स्वतःचा अमूल्य वेळ दुसर्‍यांसाठी खर्च केला तर दुसर्‍याचाही अमूल्य वेळ तुम्हाला भविष्यात मिळेल.
सध्याची जीवनशैली पहा ना ! अनेक परिवारातील आई वडील लहानपणापासून त्यांचा ठराविक वेळापत्रक करून देतात आणि स्वतःसाठीही असे ठराविक वेळापत्रक बनवून ठेवतात. मग काय ? उगवतो तसा मावळतो दिवस त्याच वेळापत्रकात एकाच घरात राहून मग एकमेकांची भेट होईल याची काही शाश्‍वती नाही.
  या जीवनात जीवन जगताना म्हणतात प्रेम, जिव्हाळा, नातीगोती खूप महत्त्वाच्या असतात. पण असं पाहिला मिळतं का हो ? या सध्याच्या जीवनशैलीत.  आता एकच पहायला मिळतं, मुलांचा आई-वडिलांचं एकमेकांशी कनेक्शन नसून, त्यांचं कनेक्शन आहे ते शाळा, महाविदयालय, मोबाईल सोशल मिडीया, नौकरी आणि दररोजचं वेळापत्रक.  तर मग कसा शोधणार पन्नाशीनंतरचा विरंगुळा ? या वेळापत्रकाच्या नियमांत बसून जीवन जगतांना सर्वच आई-वडील विसरून जातात की आपण आपल्या मुलांना घडवतो की, या जगात चालणारी चालती-बोलती कटपुतळी बनवतो व शेवटी म्हण्तो कशाची मुलं हो ! त्यांना वेळच नसतो आमच्यासाठी ! पण हे त्यांच्या लक्षात येत नाही की,  हे आपणच पेरलं आहे म्हणजेच पहा, जर लहानपणापासूनच मुलांना या समाजाच्या ठरवलेल्या नियमानुसार चालवण्यातच त्यांना गुंतवले व त्यांना खर्‍या जीवन जगण्याच्या कल्पनेपासून वंचित ठेवले, तर कसे होणार प्रेमळ, मनमिळाऊ, एखाद्याच्या दुखावर आसवांचा पाऊस पाडणारे व्यक्तिमत्व ? मी प्रत्येक आई-वडिलांना एवढच सांगते की, जीवन जगताना जेवण केल्याशिवाय कोणतीही व्यक्ती ती लहान असो किंवा मोठी जगू शकत नाही, त्याचप्रमाणे आपल्या मुलांना आपल्या प्रेमाची भूक लागली पाहिजे आणि त्याशिवाय त्यांचे जगणे अशक्य झालं पाहिजे. म्हणजेच पहा जर लहानपणापासूनच मुलांसाठी वेळ काढला, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या, त्यांच्या व आपल्या विचारांची देवाण-घेवाण केली, आतापर्यंत होऊन गेलेल्या थोर महात्म्यांची जीवन गाथा त्यांना आवडेल अशा स्वरुपात समजून दिली, त्यांच्या सोबत आपला अमूल्य वेळ काढून दंगामस्ती केली तर मुलांचं मन असे घडेल की, त्या मनात नेहमी रुजत जाईल की या जगात ठरवलेल्या वेळापत्रका पलीकडे काहीतरी राहिले आहे. आणि ते म्हणजे आई-वडिलांचा सहवास. हा सहवास तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांचे पालन-पोषण करताना आपले निर्बंध त्यांच्यावर लादता या समाजाचे नियम अटी त्यांच्यावर न सोपवता, त्यांच्या मनाचा विचार करून त्यांची आवड ओळखून, त्यातच त्यांना घडवलं तर मूलही खुश होतील आणि आईवडिलांविषयी त्यांच्या मनावर असा एक न पुसता येणारा आपुलकीचा ठसा उमटेल त्यातूनच त्यांना आई-वडीलांचे आकर्षण वाटेल व त्यांचा सहवास हवाहवासा वाटेल.
  आता तुम्ही म्हणाल लग्नानंतर काय हो ? राहतात का मुलं आपली ! मग काय लग्नानंतर तुम्ही त्यांना लोकांची मुलं आहेत असे म्हणता,  का म्हणू शकता ? मग घ्या ना थोडसं आणि सांभाळून घेण्यासाठी काही अवघड नाही यासाठी फक्त येणारी ‘ती’ कोण असेल तिला आपल्या मुला पेक्षा जास्त प्रेम करावे लागेल तुमचे नियम अटी बंधन न घालता अगोदर तिच्या आवडी जाणून घेऊन तिला आपल्या प्रमाणेच प्रेमामध्ये सहभागी करून घ्यावे लागेल. तुम्हाला तिची एखादी गोष्ट आवडली नाही तर सांगून पहा, ती आठ ते नऊ वेळेस करेल तुम्ही काहीच म्हणू नका, दहा वेळेस ती स्वतः तुमच्या मनासारखे वागेल, कारण प्रेमात जे शक्य आहे ते विरोधात नाही, यातूनच एकमेकांच्या मनाचे एकमेकांशी नाते घट्ट होईल व परिवारातील सदस्यांचा सहवास कायम टिकून राहील.
  पन्नाशीनंतर जर तुम्हाला मुलांसारखा तुमच्यासोबतचा सहवास तुमच्या मुलांसोबत हवा असेल व पन्नाशीनंतरचा विरंगुळा हवा असेल तर प्रत्येकाने २ छंद जोपासले पाहिजेत पहिला म्हणजे आपल्या मुलांच्या मनाशी आपले कनेक्शन हे अतूट झाले पाहिजे म्हणजेच मुलांना आपल्या सहवासाची भूक लागली पाहिजे आणि दुसरा म्हणजे प्रत्येकाला जीवन जगताना काही ना काही आवड असते, उदा. वाचनाची, टाकाऊ पासून टिकाऊ बनवण्याची, गाणे ऐकण्याची, कविता लिहिण्याची, चित्र काढण्याची, संगीताची, नवीन शोध लावण्याची इ. बरेच असे छंद आतापासूनच जोपासावा, त्यामुळे तुम्हाला विरंगुळा शोधण्याची गरज पडणार नाही व म्हातारपण आले की गेले, हेही समजणार नाही व याचा फायदा तुमच्या इतर परिवारातील सदस्यांना पण होईल व प्रत्येक परिवार सुखी समाधानी होईल. याचाच अर्थ असे संस्कार पिढ्यानपिढ्या तुमच्या परिवारातील सदस्यांवर घडतील आणि मानावे लागणार नाही आमच्या मुलांना आमच्यासाठी वेळच नाही व तेव्हाच वृद्धाश्रमाची गरज पडणार नाही

 

                                                                                                                                                                                                                                                              सौ. स्वाती शंकर चव्हाण, 

                                                                                                                                                                                                             अंबाजोगाई  ९६०४५७१३१८

 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.