सुशिक्षित बेरोजगार फसवणूक प्रकरणी केज पोलिसात तक्रार दाखल महिला कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
केज दि. ५ - ( प्रतिनिधी ) हरीओम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एम.एस.गोडसे यांनी अनेक सुशिक्षीत बेरोजगार तरुण तरुणांनीना आपल्या संस्थेत नौकरी देतो म्हणून व बनावट नियुक्ती पत्र देऊन लाखो रुपयाला गंडा घातल्याचे सांगत आज फसवणूक झालेल्या दोघा सुशिक्षित बेरोजगारांनी पत्रकार परिषदेत फसवणुकीचा प्रकार समोर आणला. तसेच केज पोलिसात तक्रार दिली असून न्यायाची मागणी केली आहे.
बीड तालुक्यातील नेकनुर येथील हरि ओम शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत आदर्श मंतीमंद निवासी विद्यालय नांदूर फाटा ता.जि.बीड या शाळेवर काळजी वाहक पदावर तात्या लव्हू गवळी यांना नियुक्ती आदेश २०११ ला दिला. त्यावेळी गवळी यांनी अध्यक्ष गोडसे यांना नगदी ठरल्याप्रमाणे रक्कम ही दिली.काही वर्षे नौकरी ही केली मात्र या काळात गोडसे यांनी एकही रुपया न देता काम करुन घेतले.आता ही शाळा अनुदानास पात्र ठरली असताना देखील तात्या गवळी यांना पगार मिळेना म्हणून गवळी यांनी वेळोवेळी गोडसे यांना चौकशी करून पगार चालू करण्याची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली.पगार जर चालू होत नसेल तर मी तुम्हाला दिलेले माझे पैसे मला परत देण्याची मागणी गवळी यांनी अध्यक्ष गोडसे यांना केली, तेव्हा गोडसे म्हणाले तु मुकाट्याने येथून चालता हो नसता माझ्या बायकोचा विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा नोंद करील. म्हणून वैतागलेल्या तात्या गवळीने नेकनुर पोलीस ठाणे गाठून अध्यक्ष गोडसे यांच्यावर फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.मात्र तेथील पोलीस कर्मचारी यांनी तक्रार नोंदवून न घेता उडवाउडवीची उत्तरे देत तक्रार न घेता परत पाठवले.दरम्यान तात्या गवळी यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी निवेद्वारे कळवले आहे की माझी तक्रार नोंदवून न घेणाऱ्या पोलीस कर्मचा-यावर व अध्यक्ष गोडसे यांच्यावर योग्य कार्यवाही करुन न्याय देण्याची मागणी दि.३१ जानेवारीला केली आहे.
तसेच मुकिंदा गोपाळ तांदळे यांनीही केज पोलिसात तक्रार दाखल केली आहे.यामध्ये त्यांनी त्यांची पत्नी मंदाकिनी मूकींदा तांदळे यांना आदर्श मतिमंद निवासी विद्यालय नांदूरफाटा येथे नौकरीस लावतो म्हणून गोडसे यांनी साडेतीन लाख रुपये घेतले.मात्र नौकरीस लावले नाही.याबाबत नेकनूर पोलिसात गुन्हाही दाखल केला आहे.मात्र दि.३ फेब्रुवारी रोजी मी माझ्या उमरी येथील शाळेवर असताना गोडसे यांनी माझ्या मोबाईलवर फोन करून तुझा चेक माझ्याकडे आहे. त्यावर मी वाट्टेल तेवडी रक्कम टाकून तुझ्या विरुद्ध गुन्हा नोंद करीन, तसेच तू माझ्या शाळेवर पैसे मागण्यास आलास तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. तरी सदर इसमापासून माझ्या जीवाला धोका असून सदर प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्याय द्यावा अशी तक्रार मुकींदा तांदळे यांनी केज पोलिसात दिली आहे. याप्रकरणी गवळी व तांदळे यांनी आज सक्रीय पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेऊन प्रसार माध्यमांनीही सदरील प्रकरणाला वाचा फोडण्याची विनंती केली असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Add new comment