लाइव न्यूज़
महाराष्ट्राचा इज्तेमा; औरंगाबाद जिल्ह्यातील लिंबेजळगाव मधील तयारी अंतीम टप्प्यात
दि.२४,२५,२६ फेब्रुवारी रोजी लाखो मुस्लिम बांधव होणार सहभागी
बीड (प्रतिनिधी) औरंगाबाद जिल्ह्यातील लिंबेजळगाव येथे दि.२४, २५, २६ फेब्रुवारी रोजी तीन दिवसीय राज्य इज्तेमाचे आयोजन करण्यात आलेे आहे. गेल्या आठ महिन्यांपासून महाराष्ट्राच्या इज्तेमाची सुरू असलेली तयारी अंतीम टप्प्यात आहे. तीन दिवसीय इज्तेमा यशस्वी करण्यासाठी दररोज हजारो मुस्लिम स्वयंसेवक परिश्रम घेत असुन बीड जिल्ह्यातील स्वयंसेवकही त्यात सहभागी होवू लागले आहेत. लिंबेजळगाव येथील इज्तेमासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव दाखल होणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम बांधवांचा राज्यस्तरीय इज्तेमा दि.२४, २५, २६ फेब्रुवारी रोजी लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद) येथे होत आहे. आठ महिन्यांपासून त्याची तयारी सुरू असुन लाखोंच्या संख्येने दाखल होणार्या मुस्लिम बांधवांसाठी आवश्यक सर्व सुविधा उभारणीचे काम अंतीम टप्प्यात आहे. दररोज हजारो स्वयंसेवक त्यासाठी परिश्रम घेत असुन बीड जिल्ह्यातून विविध भागातील स्वयंसेवक त्याठिकाणी दाखल होत आहेत.
इज्तेमाकी मजलिस
दि.२४ फेब्रुवारी सुबह १० से १२ तालीम के हलके लगेंगे. जोहर के बाद उमुमी बयान (व्याख्यान, मार्गदर्शन) असर के बाद उमुमी बयान और मामुलात की बातचीत, मगरिब बाद उमुमी बयान
दि.२५ फेब्रुवारी, फजर के बाद उमुमी बयान और मशोरे के पिंडालमे बात, सुबह १० से १२ तालीम के हलके और हलका तशकिली, जोहर के बाद मकामी काम की बातचीत, असर के बाद निकाह की बात और खुतबा तख्त से होंगा(इज्तेमाई शादीया), मगरिब के बाद उमुमी बयान
दि.२६ फेब्रुवारी, फजर के बाद उमुमी बयान, सुबह १० से १२ इज्तेमाकी आखरी मजलिस-रवानगी की बात और दुवा
Add new comment