लाइव न्यूज़
पाटोदा शिवारातील बारा एकर ऊस जळाला
अंबाजोगाई (प्रतिनिधी अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा शिवारातील ईश्वर लोहिया या शेतकऱ्याचा बारा एकर ऊस विद्युत पुरवठा तारांच्या स्पार्किंग मुळे जळल्या ची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे शेतकऱ्याचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मागच्या चार पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती नंतर गतवर्षी पासून निसर्गाने साथ दिल्यानंतर ऊस उत्पादक पट्ट्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली होती. पाटोदा शिवारात होळना नदी च्या काठी ईश्वर लोहिया या शेतकऱ्याचा बारा एकर तोडणीसाठी आलेला ऊस उभा होता. विद्युत लोंबकत्या तारांची स्पार्किंग झाल्याने बारा एकर क्षेत्राचा ऊस जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Add new comment