भारतीय जनता पक्षाचा विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणार-उज्जैन बनसोडे
अंबाजोगाई (प्रतिनिधी) भाजपाचे विचार व पक्षाने केंद्र व राज्य सरकार मार्फत घेतलेले लोकोपयोगी निर्णय, कार्य समाजातील शेवटच्या माणसांपर्यंत म्हणजे तळागाळापर्यंत पोहोचविणार आहे. राज्याच्या मंञी व जिल्ह्याच्या पालकमंञी ना.पंकजाताई मुंडे, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, आमदार.संगिता ठोंबरे,जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे,युवा मोर्चाचे बीड जिल्हाअध्यक्ष स्वप्निल गलधर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे काम सर्वांना सोबत घेवून गतीमान करणार आहे.असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष उज्जैन गोरोबा बनसोडे यांनी केले.
अंबाजोगाई येथील भाजपाचे युवा कार्यकर्ते उज्जैन गोरोबा बनसोडे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बीड जिल्हा उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. अंबाजोगाई येथील शासकीय विश्रामगृहावर दिनांक 31 जानेवारी बुधवार रोजी झालेल्या भारतीय जनता पक्ष पदाधिकार्यांच्या बैठकीत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी उज्जैन गोरोबा बनसोडे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करून त्यांना नियुक्तीचे पञही दिले.नियुक्तीपत्र देताना यावेळी अंबाजोगाई नगर परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती सुरेश कराड, नगरसेवक कमलाकर कोपले, नगरसेवक दिलीपराव काळे,नगरसेवक अनंत लोमटे,बीड जिल्हा बँकेचे संचालक हिंदूलाल काकडे, अंबाजोगाई पंचायत समितीचे सदस्य अॅड.सतीष केंद्रे,ज्येष्ठ नेते राजा ठाकूर, बालासाहेब पाटलोबा शेप,युवा मोर्चाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष विलास जगताप,युवा नेते सचिन वाघमारे,अहेमद पप्पुवाले आदींची उपस्थिती होती.
उज्जैन गोरोबा बनसोडे हे गेली 15 वर्षापासुन सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासुन ते कार्य करित आहेत.प्रशिक सेवाभावी संस्था व शारदा मागासवर्गीय औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था अंतर्गत त्यांनी समाजातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी सातत्याने मार्गदर्शन व सहकार्य कार्य केले आहे.तसेच काही दिवसांपुर्वी झालेल्या नगरपरिषद व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी व विजयासाठी घेतलेली मेहनत,भारतीय जनता पक्षाचे शहर व ग्रामिण भागात संघटनात्मक बळ वाढविण्याकरीता केलेले पक्षकार्य याची योग्य अशी नोंद व दखल घेवून संगिताताई ठोंबरे यांनी उज्जैन बनसोडे यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बीड जिल्हा उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली आहे.
आपल्या निवडीबद्दल बोलताना उज्जैन बनसोडे यांनी सांगितले की,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हाउपाध्यक्षपदी माझी निवड करून केज विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आ. प्रा.सौ.संगीताताई ठोंबरे व पक्षातील सर्व ज्येष्ठनेते यांचे पक्षकार्य करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. मिळालेल्या जबाबदारीची जाणिव असून सर्वांना सोबत घेवून भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाची ताकद जिल्ह्यात वाढविणार असून राज्याच्या मंञी व जिल्ह्याच्या पालकमंञी आमच्या नेत्या ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे, खासदार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे, आमदार .संगिताताई ठोंबरे,जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे,युवा मोर्चाचे बीड जिल्हाअध्यक्ष स्वप्निल गलधर यांचे नेतृत्व बळकट करून पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी एक लहान कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे उज्जैन बनसोडे यांनी सांगितले.त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे भाजपाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सुनीलकाका लोमटे,भाजपाचे विभागीय प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी,बीड जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रयआबा पाटील युवा नेते राजेशजी कराड,अंबाजोगाई तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष गणेश कराड, भाजपाचे तालुकाध्यक्ष जाधव, नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे,अंबाजोगाई शहराध्यक्ष संजय गंभीरे,अमीत जाजू, सुजितसिंह दिख्खत, राजेश वाघुंबरे,महेश शेप,आदीनाथ शेप, बाळासाहेब पवार, सुरज कचरे,संदिपान दादा गंगणे,अमोल शेंगुंळे,मोबीन देशमुख, किशोर काटे,आनंद मोरे,प्रभुलिंग तांबे आदींसहीत भाजपाचे सर्व नेते,कार्यकर्ते व मिञपरीवार यांनी उज्जैन बनसोडे यांच्या निवडीचे स्वागत करून अभिनंदन केले आहे.
===============
Add new comment