मोटारसायकलच्या धडकेत मायलेकीचा मृत्यू
अंबाजोगाई , (प्रतिनिधी ):- भरधाव वेगाने गाडी चालविणार्या मोटारसायकल स्वाराने जोराची धडक दिल्याने रस्त्यावरून चालत कामावर निघालेल्या मायलेकी गंभीर जखमी झाल्या असून हा अपघात शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अंबाजोगाई लोखंडी सावरगाव रोडवरील कृषी महाविद्यालयासमोर झाला.माय लेकीवर लातुर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री उशिरा दोघींची प्राणज्योत मालावली.अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयासमोर भरधाव दुचाकी स्वराने मायलेकींना उडविले.शालिनी राजेंद्र बत्तीशे (वय ३२) आणि त्यांची मुलगी प्रियांका (वय १२, रा. मोरेवाडी) या दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना लातूर येथे उपचारासाठी दाखल केले असता, रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान अपघातात दोघी मायलेकींच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्या जागेवरच बेशुद्ध झाल्या. त्या ठिकाणी उपस्थित असणारे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी तातडीने दोघींना उचलून रिक्षात घातले आणि उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर लातूर येथे उपचारासाठी दाखल केल्यानंतर रात्री उशिरा दोघींचा मृत्यू झाला.
Add new comment