दोन वर्षांपासून आम्रपाली जगतेय हालाकीचे जीवन!

जिल्हा रुग्णालय नेहमी  येथे उपचारासाठी भरती होत असलेल्या रुग्णांना पुरेसी सेवा न देणे,साफसफाई न राखणे एखाद रुग्ण छवविच्छेदन साठी त्याच्या नातेवाईकांना तासंतास लाटकवत ठेवणे ह्या कारणासाठी चर्चेत राहते परंतु या जिल्हा रुग्णालयातील काही डाक्टर,  नर्स आणि कर्मचारी हे हे आज ही रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हणून सेवा देतात या रुग्णालयात बर्न वार्डात मागील  दोन वर्षांपासून  एक बावीस वर्षीय भाजलेल्या मुलीस या बर्न वार्डातील कर्मचारी आणि नर्स आधार देत आहेत,  
घटनेची थोडक्यात माहिती अशी आहे की बंगाली पिंपडा तालुका गेवराई येथील रहिवासी असलेली आम्रपाली ( मिनहाज हुसेन शेख ) ही जालना येथे एक  खाजगी  रुग्णालयात नौकरीस होती नोकरी असल्यामुळे ती जालना येथे रूम भाड्याने करून राहत होती राहत असताना त्याची ओढख नारायण दिनकर काकडे राहणार बंगाली पिंपडा याच्याशी झाली ओढखीचे रूपांतर मग प्रेमात झाले आणि नारायण आम्रपाली याच्या सोबतच  राहू लागला काही महिने सुख समाधानाने रहात असताना नारायण हा सतत पिऊन आम्रपालीकडे यायचा आणि काही ना काही कारणाने त्याच्याशी हुज्जत घालायचा एका दिवशी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात आम्रपाली ने स्वतःच्या अंगावर रॅकेल टाकून पेटवून घेतले त्याला जिल्हा रुग्णालयात राजेंद्र सांडूके नामक व्यक्तीने भरती केले ती अंशी टक्के जळाली होती जिल्हा रुग्णल्यातील डाक्टरानी त्यावर उपचार करून त्याचा जीव वाचविण्यात यशस्वी झाले 

उपचार झाल्या नंतर २०१६ मध्ये आम्रपाली याची रुग्णालयातून सुट्टी झाली सुट्टी झाल्या नंतर ही त्याचे आई,वडील,नातेवाईक कोणीही त्यास घरी घेऊन जाण्यास तयार नाहीत आज दोन वर्षांपासून रुग्णालयातील कर्मचारी आणि नर्स या मुलीची देखभाल करत आहेत कपडे, साबण,साफसफाई सर्व काही करत आहेत  आणि ती ही रुग्णालय सडून जाण्यास तयार नाही या वार्डातील सेवा देणारे डाकटर,नर्स यांनी जिल्लाह अधिकारी,चकलबा पोलीस स्टेशन जिल्लाह शल्य चिकित्सक यांच्याकडे लेखी पत्र व्यवहार करून सुद्धा दोन वर्षा नंतर ही प्रशासनाने या तक्रारीची आतापर्यंत गंभीर दखल घेतली नाही बीड चे खासदार प्रितम ताई मुंडे यांनी ही या मुलीची भेट घेतली असून आता पर्यंत या बाबतीत काही निर्णय घेतलेले नाही या मुलीला भविष्याची चिंताने ग्रासले असून प्रसनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे असे या मुलीची म्हणणे अाहे

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.