निकाल लागेपर्यंत फारूक पटेल यांची जागा रिक्त ठेवण्याचे आदेश
बीड (रिपोर्टर) येथील नगर पालिकेतील नगरसेवक फारूक पटेल यांनी अपात्रतेच्या विरूध्द उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सदर याचिका निकाली काढतांना न्यायालयाने निकाल लागेपर्यंत पटेल यांच्या जागी निवडणूक न घेता सदर जागा रिक्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आघाडीचे नगरसेवक फारूक पटेल यांनी जिल्हाधिकारी यांच्या अपात्र ठरवल्याच्या आदेशाविरोधात राज्यमंत्री नगरविकास यांच्याकडे अपील दाखल केले होते. मात्र राज्यमंत्र्यांनी दि.३०-१०-२०१७ रोजी दिलेली स्थगिती ५-१-२०१८ रोजी उठविली होती. या स्थगिती उठवल्याच्या आदेशाविरोधात फारूक पटेल यांनी उच्च न्यायालयात औरंगाबाद येथे याचिका दाखल केली होती. याचिकेची सुनावणी ३१ जानेवारी २०१८ रोजी झाली. न्यायमुर्ती आर.बी.घुगे यांनी राज्यमंत्री नगर विकास यांना फारूक पटेल यांनी दाखल केलेले अपील दि.५-३-२०१८ रोजी निकाली काढण्याचे आदेश दिले व या काळात पटेल यांची जागा निवडणूक न घेता रिक्त ठेवावी असे आदेशीत केले. फारूक पटेल यांच्यावतीने ऍड.तौसीफ यासीन यांनी काम पाहिले.
Add new comment