लाइव न्यूज़
नंदकिशोर मुंदडा यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सामुहिक मुंडन

अंबाजोगाई(प्रतिनिधी*):डॉ. विमलताई मुंदडा विचारमंचाच्यावतीने सर्वसामान्य जनतेच्या विविध मुलभुत मागण्यासाठी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व वीस कार्यकर्तांसहीत उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चालु आहे,तरीही या सरकारला जाग येत नाहीय यासाठी विचारमंचाच्यावतीने विविध आंदोलन करण्यात येत आहे ऐकवीस जणांनी मुंडन करुन या सरकारचा जाहीर निषेध केला.
सत्ताधारी हे फक्त बोलतात काम करुन दाखवित नाहीत यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अंबाजोगाई येथे उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालु असलेले डॉ.विमलताई मुंदडा विचारमंचाचे उपोषण होय,कारण या उपोषणात ज्या मागण्या आहेत त्या सर्वसामान्य जनतेच्याच आहेत परंतु हे सरकार व सरकारचे प्रतिनिधी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत,या मागण्यामध्ये अंबायावेाई जवळील लोखंडी सावरगाव परिसरात तब्बल ३० कोटी रुपये खर्चून जेनेटिक आणि वंध्यत्व निवारण रुग्णालयासाठी इमारत उभी केली. हि इमारत वापराअभावी मागील १० वर्षापासून धूळ खात पडून आहे. या इमारतीत तातडीने जेनेटिक आणि वंध्यत्व निवारण रुग्णालय सुरु करावे हि मुंदडा यांची प्रमुख मागणी आहे. याठिकाणी १०० खाटांचे स्त्री रुग्णालय सुरु करावे जेणेकरून स्त्रियांना अधिक चांगले उपचार मिळू शकतील आणि स्वाराती रूग्णालयावरील ताण कमी होईल. याच परिसरात आरटीओ कार्यालय बांधण्यात यावे आणि संपूर्ण परिसराला स्व. विमलताई मुंदडा यांचे नाव देण्यात यावे. इतर मागण्यात अंबाजोगाई शहराबाहेर असलेले महाबीजचे कार्यालय शहरात आणावे, महावितरण कार्यालयासमोरील उपोषणाच्या वेळी लिखित स्वरूप दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, केज तालुक्यातील पाथरा आणि अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा या दोन्ही ठिकाणी १३२ के.व्ही. उपकेंद्र मंजूर करण्यात यावे तसेच सोमनाथ बोरगाव, डीघोळअंबा, उंदरी, वाघेबाभळगाव या ठिकाणी ३३ के.व्ही. उपकेंद्र सुरु करण्यात यावे,स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात अत्यावश्यक यंत्रसामुग्री आणि औषधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, विनोद गायकवाड,रफिक भाई शेख,शेख मुजुभाई,संजय सुराणा,रशिदभाई जरगर,रामेश्वर राऊत,ज्ञानेश्वर सुर्यवंशी,सुभाष बिक्कड,बिभीषण भोसले,अमोल पवार,अनंत आरसुडे,दिपक मस्के,महादेव सुरवसे,अनिल धोत्रे,गणेश जाधव,विष्णु चौगुले,लक्ष्मण केदार,शुभम बिक्कड,अशोक माने,बरडे पाटील,संतोष जाधवयांंनी सर्वांनी मुंडन केले,यावेळी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा,युवा नेते अक्षय मुंदडा,उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,उपसभापती तानाजी देशमुख,सभापती मधुकर कांचगुडे, अँड.संतोष लोमटे,नगरसेवक रहिमभाई,ताहेरभाई,संतोष शिनगारे,बाला पाथरकर,महेश अंबाड,योगेश कडबाने आदी असंख्य कार्यकर्तांची उपस्थिती होती.
Add new comment