टीव्ही, मोबाइल महागणार; प्रत्येक बिलावर अधि’भार’ ,देशातील गरिब जनतेला मोफत घर व गॅस कनेक्शन देण्याची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसेवा) लोकसभेसह नऊ राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकरी वर्ग आणि ग्रामीण भागाल खूष करणारा अर्थसंकल्प मांडला आहे. मात्र हे करताना सरकारने कस्टम ड्यूटी वाढवली आहे. त्यामुळे टीव्ही आणि मोबाइल महागणार आहे. त्याशिवाय प्रत्येक बिलावर अधिभार वाढविण्यात आल्याने कोणत्याही बिलावर आता एक टक्का अधिक रक्कम आकारली जाणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारने आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न केला असून आगामी काळात त्याची झळ सर्वसामान्यांना बसणार आहे. दरम्यान अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने मेक इन इंडियावर भर दिल्याने आयात मालांवर जास्तीत जास्त कर आकारण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे मोबाइल, टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू महागण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करून या शक्यतेवर शिक्कामोर्तब केला आहे. टीव्ही आणि मोबाइलवरील कस्टम ड्युटीत भरघोस वाढ केल्याने टीव्ही संच आणि मोबाइल महागणार आहे.
देशातील गरिब जनतेला मोफत घर व गॅस कनेक्शन देण्याची घोषणा
Add new comment