लाइव न्यूज़
फारूख पटेल यांची याचिका न्यायालयाने फेटाळली
Beed Citizen | Updated: February 1, 2018 - 3:18pm
बीड, (प्रतिनिधी):- नगर पालिकेचे आघाडीचे गटनेते असलेल्या फारूख पटेल यांच्या विरोधात अवैध बांधकाम प्रकरणी इम्तियाज तांबोळी यांनी जिल्हाधिकार्यांकडे याचिका दाखल केली होती. यावर जिल्हाधिकार्यांनी त्यांना अपात्र ठरवले होते. पटेल यांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे.
बीड शहराचे आघाडीचे गटनेते नगरसेवक फारूख पटेल यांनी केलेल्या अवैध बांधकामाच्या विरोधात इम्तियाज तांबोळी यांनी जिल्हाधिकार्यांकडे अपात्रेबाबत याचिका दाखल केली होती. यावर जिल्हाधिकारी यांनी पटेल यांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर पटेल यांनी राज्य शासनाकडे अपिल दाखल केले होते. नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी याबाबत तात्पुर्वी स्थगिती दिली होती. मात्र दि.५ जानेवारी २०१८ ला ही स्थगिती उठावण्यात आली होती. स्थगिती उठवल्यानंतर पटेल यांनी पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावली असून या निर्णयाबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असल्याचे सांगण्यात आले.
Add new comment