बीडचा रेल्वे प्रश्न थेट रेल्वे मंत्र्यांच्या दरबारी ! पालकमंत्री पंकजाताईंची पियुष गोयल यांच्याशी चर्चा

बीड ( प्रतिनिधी ) रेल्वे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेवून नगर - बीड - परळी रेल्वे मार्ग प्रश्नी चर्चा केली. उभयतांमध्ये झालेल्या चर्चेमुळे या मार्गाला अधिक गती मिळण्याचे संकेत असून 2019 मध्ये रेल्वेची झुक .. झुक ... बीडकरांच्या कानी पडण्याची शक्यता आहे.
देशाचा अर्थसंकल्प 2018 उद्या दि. 1 फेब्रुवारी रोजी सादर होत आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर रेल्वे बजेटला सार्वजनिक अर्थसंकल्पात समावेशीत करण्यात आलेले आहे. गतवर्षी 2017 - 18 च्या अर्थसंकल्पात प्रथमच सार्वजनिक आणि रेल्वे असे एकत्रित बजेट सादर करण्यात आले होते. त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजीही दोन्ही बजेट एकाच वेळी सादर केले जाणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे देशाचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट घेतली. उभयतांमध्ये नगर - बीड - परळी रेल्वे मार्गासंदर्भात चर्चा झाली. प्रस्तावित मार्ग , झालेले भूसंपादन , उपलब्ध निधी आणि आत्तापर्यंत झालेला खर्च आदी मुद्द्यांवर गोयल आणि पंकजाताई यांच्यामध्ये चर्चा झाली. 2019 पर्यंत हा मार्ग पूर्ण होण्याच्या अनुषंगाने काम सुरू असल्याचे पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले असता रेल्वे मंत्र्यांनीही या मार्गाच्या परिपूर्णतेविषयी सकारात्मकता दर्शवली. पालकमंत्री पंकजाताई मुंडे आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या चर्चेमुळे हा रेल्वे मार्ग अधिक गतीने पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.