लाइव न्यूज़
आमदारांना सेल्फी काढायला वेळ आहे मात्र शेतकर्यांसाठी नाही

अंबाजोगाई (प्रतिनिधी) जनतेच्या विविध प्रश्नासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेली चार पाच दिवसांपासून तुम्हा आम्हा सर्वांचे ज्येष्ट नेते नंदकिशोर मुंदडा व काही कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. मात्र या प्रश्नाकडे प्रशासन व सरकारला वेळ नाही. केजच्या स्थानिक आमदारांना आमिर खान सोबत सेल्फी काढायला वेळ आहे. मात्र शेतकर्यांच्या प्रश्नासाठी बैठक घ्यायला वेळ नाही असा घणाघाती हल्ला युवक नेते अक्षय मुंदडा यांनी केला.
ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या आमरण उपोषणाला पाठींबा म्हणून दोन दिवसापूर्वी केजला रास्ता रोको करण्यात आला होता. आज सकाळी अंबाजोगाई तालुक्यातील व शहरातील डॉ.विमलताई मुंदडा विचार मंचच्यावतीने यशवंतराव चव्हाण चौकात रास्ता रोको दोन तास करण्यात आला. यावेळी बोलतांना अक्षय मुंदडा म्हणाले की, केज विधानसभा मतदार संघातील सर्व सामान्य जनतेने ताईंना सतत संधी दिली. मोर्चेकर्यासमोर उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, शेख रहीमभाई, वैजनाथ देशमुख, योगेश कळाने, आदिंची भाषणे झाली. यावेळी पंडित जोगदंड, नगरसेवक संतोष शिनगारे, खलील मौलाना, ताहेर भाई, दिग्वीजय लोमटे, उपसभापती तानाजी देशमुख, सभापती मधुकर काचगुंडे, अशोक तापडे, संजय साळवे, राजेश वाव्हुळे, शेख पटेल, बबन आपेट, राजु भन्साळी, राजाभाऊ गंगणे, हरगुंळे आप्पा, आजित सांगळे, संतोष लोमटे, कल्याण, अमोल पवार, केज, अंबाजोगाई, होळ सह ग्रामीण भागातील मुंदडा यांना माननार्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. रस्ता रोको नंतर सर्व कार्यकर्ते उपोषणस्थळी जावून नंदकिशोर मुंदडा यांना भेटले.
Add new comment