सन 1990 - 1991 चा वर्गमित्र मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
आष्टी - (प्रतिनिधी) जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुलांची आष्टी,ता.आष्टी,जि.बीड येथील शाळेत इ.10 वी मध्ये सन 1990 - 1991 मध्ये शिक्षण घेतलेल्या वर्गमित्रांचा मेळावा दिनांक 28 जानेवारी 2018 रोजी मुलांची शाळा आष्टी येथे तत्कालीन आदर्श शिक्षकांच्या समवेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.अशी माहिती वर्गमित्र मेळाव्याचे निमंत्रक तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र लाड यांनी दिली.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ठ शिक्षक प्रकाश सातपुते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तत्कालीन आदर्श शिक्षक शरदचंद्र वैद्य,शेख फरीद,दिगांबर खांडके,संपत गायकवाड,संभाजी नवसुपे,एस.व्ही.देशपांडे,ए.बी.मुळे, रावसाहेब खराडे,साहेबराव कोंडे,मंगलप्रभा गर्जे,आर.एम.चव्हाण,साळवे मामा,भाऊसाहेब जगताप उपस्थित होते.
यावेळी वर्गमित्र नाथा कोकरे,हरिभाऊ कावळे,विजय रेडेकर,राजु गरसुळे,परमेश्वर वाल्हेकर,दयानंद देशमुख,गजेंद्र पोतदार,संतोष ढोबळे,शिक्षक भंडारी सर,चोरमुले सर,काळे सर,सत्तार सर,बाळासाहेब पारगावकर सर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
वर्गमित्र मेळाव्याचे प्रास्ताविक शैलेश सह्स्रबुध्दे यांनी केले.तद्नंतर वर्गमित्रांनी आपला परिचय करुन देवून मनोगत व्यक्त केले.यावेळी सतिष भोसले,डाँ.गहिनीनाथ झगडे,नासीर पठाण,विवेक सोळसे,चंद्रभान धोंडे,शौकत बेग,राजू पठाण,बाळासाहेब पोकळे,जाकीर पठाण,श्रीकांत दासखेडकर,सय्यद रईस,श्रीपाद बळे यांच्या शुभहस्ते तत्कालीन आदर्श शिक्षकांचा शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी भाऊसाहेब जगताप,शरदचंद्र वैद्य,प्रकाश सातपुते यांनी आपले सविस्तर मनोगत व्यक्त करुन भावी वाटचालीस वर्गमित्रांना शुभेच्छा दिल्या.
मेळाव्याचे बहारदार सुत्रसंचलन राजेंद्र लाड यांनी केले तर आभार शेषराव सानप यांनी मानून राष्ट्रगीताने समारोप झाला.तद्नंतर सर्वांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.मेळावा यशस्वी करण्यासाठी वर्गमित्र श्रीपाद बळे,श्रीकांत दासखेडकर,चंद्रभान धोंडे,सुरेंद्र भागवत,शैलेश सह्स्रबुध्दे,राजेंद्र लाड,बुआसाहेब निंबोरे,गणेश धोंडे,किरण धोंडे,अँड.शेख रियाज,अँड.रामहारी मुटकुळे,बाळकृष्ण पवार,भुषण गरगडे,नवनाथ लोंढे,अशोक नलावडे,प्रदीप धोंडे,राजेंद्र झगडे,मिर्झा समीर,संजय कचरे,शाहु निकाळजे,शाम डहाळे,विलास चंदनशिव, शिवाजी जाधव आदींनी कठोर परिश्रम घेतले.
Add new comment