लाइव न्यूज़
दारूबंदीसाठी महिला सरसावल्या; भैय्या मोरे यांच्यासह शिष्टमंडळाचे दारूबंदी अधिकार्यांना निवेदन
बीड (प्रतिनिधी) शहरातील धानोरा रोड लगत असलेला प्रभाग क्र.२४ मध्ये पुर्णपणे दारूबंदी करण्यात यावी या मागणीसाठी येथील महिला सरसावल्या असुन वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देवून प्रभागात दारूबंदी करावी अशी मागणी केली जात आहे. या प्रभागाच्या नगरसेविका सिता भैय्यासाहेब मोरे यांनी महिलांना एकत्रीत करून दारूबंदी विषयी जनजागृती केली आहे. भैय्यासाहेब मोरे, नगरसेवक रंजित बन्सोडेयांच्यासह शिष्टमंडळाने दारूबंदी अधिकार्यांना निवेदन देवून प्रभागातील दारू दुकाने बंद करावीत अशी मागणी केली आहे.
दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. नशेच्या आहारी जावून संसाराची राख रांगोळी होतानाचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. त्यामुळे प्रभाग क्र.२४ मध्ये पुर्णपणे दारूबंदी करण्यात यावी यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहेत. ९३० महिलांच्या सह्यांचे निवेदन दारूबंदी अधिकारी यांना सुपूर्द केले असून २३३ महिलांच्या सह्यांचे व्हेरीफीकेशन करण्यात आले आहे. भैय्यासाहेब मोरे यांच्यासह नगरसेवक रंजित बन्सोडे, मिनाताई खोडवे, काटे मॅडम यांनी दारूबंदीसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृृती अभियान हाती घेतले असुन प्रभागातील नागरीकही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
Add new comment