लाइव न्यूज़
'पर्यटन' पर्वाचा शुभारंभ- आ. विनायक मेटे
बीड प्रतिनिधी ः- बीड शहरापासुन जवळच असलेल्या बिंदुसरा तलावा नजिक युवा शांतीवन हे ठिकाण पर्यटन क्षेत्र म्हणुन विकसीत व्हावे या साठी गेल्या अनेक महिन्यापासुन आ. विनायक मेटे हे सातत्याने प्रयत्न करत आहेत. आज त्याचाच एक भाग म्हणुन वनविभागा मार्फत बिंदुसरा तलावा मध्ये पर्यटकांसाठी बोटींगची सेवा आ. विनायक मेटे यांच्या शुभ हस्ते व विभागीय वनधिकारी अमोल सातपुते, राजेंद्र मस्के, प्रभाकर कोलंगडे, डॉ. रमेश पानसंबळ, भारत काळे, अनिल घुमरे, प्रकाश पिंगळे, रामहारी मेटे, ज्ञानेश्वर कोकाटे, बबन माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा सुरू करण्यात आली.
Add new comment