पत्रकारांनी निर्भिडपणे लिखान करावे-आ.क्षीरसागर

बीड (प्रतिनिधी) स्पर्धेच्या युगामध्ये सोशल मिडीया प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असले तरी मुद्रीत माध्यमांनी विश्‍वासार्हता टिकवून ठेवली आहे. पत्रकारांनीही निर्भिडपणे लिखान करावे असे आवाहन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले. तर मराठवाड्यातील पत्रकारितेला मोठा इतिहास आहे. माध्यमांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा असे आवाहन ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर, विजयराज बंब यांनी केले.
बीड येथील सामाजिक न्याय भवनात निर्भिड पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणार्‍या जिजाऊ रत्न पुरस्काराचे थाटात वितरण झाले. यावेळी व्यासपिठावर आ.जयदत्त क्षीरसागर, लेखीका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.दिपाताई क्षीरसागर, ज्येष्ठ संपादक नामदेवराव क्षीरसागर, विजयराज बंब, शेख मुजीब, काजी मकदुम, हाजी अब्दुल खालेक पेंटर, गौतम खटोड, दिपक काळकुटे निर्भिड पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा रूचीता मलबारी आदिंची उपस्थिती होती. यावेळी पो.नि.सय्यद सुलेमान, मनिषा जोगदंड यांच्यासह डॉ.दिपाताई क्षीरसागर, नामदेवराव क्षीरसागर, गौतम खटोड, पत्रकार चंदन पठाण, गोरखनाथ चिंचोलीकर, पठाण अमजद, अविनाश वाघीरकर, रवि उबाळे, अभिजीत नखाते, अशोक होळकर, दत्ता देशमुख, सिराज खान, शेख रिजवान, भास्कर ढवळे, लता ससाणे, हनुमान बडे, दिशा बनकर आदिंना जिजाऊरत्न पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे निर्भिड पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष भागवत तावरे, राज्याध्यक्ष अनिल घोरड, मराठवाडा अध्यक्ष शेख तालेब, जिल्हाध्यक्ष शेख तय्यब, शिवाजी पिंगळे, किरण डोळस, माया तिरमले, अपर्णा राठोड, दत्ता कांबळे, इमरान जहागिरदार, गोकुळ सानप, जावेद सर, हाशम पठाण, काशिफ हाशमी, आमेर शेख, भागवत वैद्य, अंगद मोहिते, अंकुश चव्हाण आदिंनी स्वागत केले.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.