महावितरणाच्या कर्मचार्‍यास मारहाण

बीड : चुकीची जोडणी असणारे विद्युत मीटर दुरुस्त करणाऱ्या महावितरणच्या तंत्रज्ञास घरमालकाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बीड तालुक्यातील माळापुरी येथे घडली.
 
महावितरण कंपनीचे पेडगाव येथील तंत्रज्ञ आकाश राम बळवंत हे दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास रोहित्र दुरुस्तीचे काम करण्यासाठी सहकाऱ्यासोबत पेडगावहून माळापुरीकडे निघाले होते. जाताना त्यांना माळापुरी येथील दगडू वामन दुताडमल यांच्या घराचे विद्युत मीटर उघडे असून त्यात चुकीची जोडणी असल्याचे आढळून आले. त्यांनी थांबून मीटर दुरुस्ती सुरु केली असता दगडू दुताडमल तिथे आला आणि माझे मीटर दुरुस्त करायचे नाही असे म्हणत आकाश बळवंत यांना मारहाण केली आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी आकशा बळवंत यांच्या फिर्यादीवरून दगडू दुताडमल याच्या विरोधात बीड ग्रामीण पोलिसात सरकारी कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.