ग्रामसभेत प्रश्न विचारल्याने एकास मारहाण; तिघांवरअॅट्रासिटी गुन्हा दाखल

 
केज: केज : प्रजासत्ताक दिनी आयोजित ग्रामसभेत शौचालयासंदर्भात प्रश्न विचारल्यामुळे एका ग्रामस्थास हॉकी स्टिकने जबर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून तिघा जणांवर अॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. हि घटना केज तालुक्यातील नांदूरघाट येथे घडली. 
 
याप्रकरणी नांदूरघाट येथील धनंजय भगवान रणदिवे यांनी फिर्यादीत नमूद केल्यानुसार प्रजासत्ताक दिनी आयोजित ग्रामसभेत ऐनवेळेस चर्चेला घेण्यासाठी त्यांनी शौचालयाबाबतीत प्रश्न उपस्थित केला होता. ग्रामसभेत सरपंच चांगण, जीवन हांगे आणि इतर सदस्यांची उपस्थिती होती. धनंजय रणदिवे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ग्रामसभेच्या शेवटी चर्चा होणे अपेक्षित असल्याने तोपर्यंत ते स्वतःचे चपला-बुटाचे दुकान उघडून बसले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शिवा मिसाळ आणि इतर दोघेजण आले. सदरील तिघांनी रणदिवे यांना जीवन हांगे यांना ओळखतोस का असे विचारले आणि ग्रामसभेत फार बोलतोस असे  म्हणत हॉकी स्टीकने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. या मारहाणीचे चित्रीकरण असल्याचा दावाही रणदिवे यांनी केला आहे. रणदिवे यांच्या फिर्यादीवरून शिवा मिसाळ आणि अन्य दोघांवर मारहाण आणि अॅट्रासिटी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.