लाइव न्यूज़
कोल्हापूर पंचगंगा पुलावरून मिनी बस कोसळली; अपघातात १३ ठार
आज (शनिवार २७ जानेवारी) सकाळी सात वाजता एका बालकाचा मृतदेह मिळाला आहे.
पुणे बालेवाडी येथील भरत केदारी यांचे कुटुंबिय असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. गणपतीपुळेहून दर्शन घेऊन येत असताना कोल्हापूरातील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाचा कठडा तोडून मिनी बस नदीत कोसळली. बसमध्ये एकाच कुटुंबातील १६ जणांचा व एक चालक अशा १७ जणांचा समावेश आहे. घटनास्थळी बुधवार पेठेतील स्थानिक लोकांच्या मदतीने सुरूवातीला बचाव कार्य सुरू करण्यात आले होते, २ तासानंतर व्हाईट आर्मीचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. या ट्रव्हल्समध्ये १७ जण होते यापैकी ८ जणांना स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले होते, तर ११ जणांना जलसमाधी मिळाली होती.
मृत व्यक्तींची नांवे खालील प्रमाणे
संतोष बबनराव वरखडे ४५ वर्षे, गौरी संतोष वरखडे १६ वर्षे, ३ ज्ञानेश्वरी संतोष वरखडे १४ वर्षे, ४ सचिन भरत केदारी ३४ वर्षे, ५ निलम सचिन केदारी २८ वर्षे, ६ संस्कृती सचिन केदारी ८ वर्षे, ७ सानिध्य सचिन केदारी ९ महिने, ८ साहिल दिलीप केदारी १४ वर्षे, ९ भावना दिलीप केदारी ३५ वर्षे, १० श्रावनी दिलीप केदारी ११वर्षे, ११ छाया दिनेश नांगरे ४१ वर्षे, १२ प्रतिक दिनेश नांगरे १४ वर्षे, १३ अज्ञात वाहन चालक २८ वर्षे,
जखमी व्यक्तींची नांवे खालील प्रमाणे
प्राजक्ता दिनेश नागरे १८ वर्षे, मनिषा संतोष वरखडे ३८ वर्षे, मंदा भरत केदारी ५४ वर्षे
Add new comment