बीडची सुशिक्षीत बेरोजगारांची परिषद अस्मितेची नाही तर अस्तित्वाची-सुभाष वारे

बीड (प्रतिनिधी) अभी नही तो कभी नही असा नारा देत आज नगर रोड येथील आंबेडकर भवनात सुशिक्षीत बेरोजगार परिषदेचे आयोजन सुराज्य सेना आणि अभिव्यक्त ग्रुप यांच्यावतीने करण्यात आले. या बेरोजगार परिषदेत नांदेड येथील फारूक अहेमद, सुभाष वारे पुणे, योगेश जाधव नांदेड, यांची उपस्थिती होती. भ्रष्टाचार निर्मुलनचे कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना फारूक अहेमद म्हणाले की, जातीधर्माच्या नावाखाली व्यवस्था युवकांना भरकावटत आहे. सरकार नवीन मुद्दे काढून युवकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे फारूक अहेमद म्हणाले. यावेळी बोलतांना म्हणाले की, भावनेचे राजकारण बस्स झालं, आता युवकांना रोजगार द्या. छत्रपती शिवबांच्या स्वराज्याचं स्वप्न वास्तवात आणणं हे बाबासाहेबांच्या संविधानात आहे. बीडची सुशिक्षीत बेरोजगारांची परिषद अस्मितेची नाही तर अस्तित्वाची असल्याचे मत वारे यांनी मांडले.
परिषदेस शेकडो युवकांनी सहभाग नोंदवून विचार मंथनातून बेरोजगारीचा प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला. सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींनी यावेळी आपले मत मांडले. देशात सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. नवीन नौकर्‍यांच्या संधी न मिळाल्याने अनेक युवक बेरोजगार पडून आहेत. यामुळे अनेक अडचणींना युवक सामोरे जात असून प्रशासनाने याची दखल घ्यावी असा सुरही युवकातून उपस्थित झाला. बेरोजगारांच्या प्रश्‍नाला वाचा फोडणारी महाराष्ट्रातील पहिली सुशिक्षीत बेरोजगार परिषद आज बीड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामजिक न्यायभवन येथे पार पडली. या परिषदेला शेकडो सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी हजेरी लावली. सरकार नवीन नौकर्‍या निर्माण करण्यात अपयशी ठरत असून युवक बेरोजगार आहेत. सरकारची जिम्मेदारी नौकर्‍या करण्याची आहे. मात्र नौकरी कपातीमुळे अनेक युवक बेरोजगार झाले आहेत. हाताला काम मिळाले नसल्याने अनेक युवकांमध्ये नैराश्य पसरले आहे. हि भावना सरकारच्या कुजकामी धोरणामुळे आली असल्याचे काही युवकांनी यावेळी बोलून दाखवले. डिग्री विकणे आहे असा सुरही यावेळी युवकांनी काढला. नौकर्‍या मिळत नसतील तर डिग्री काय कामाची? असा सवाल उपस्थित करत सुशिक्षीत बेरोजगार परिषदेतून युवकांनी नौकर्‍या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे. या परिषदेचे आयोजन अभिव्यक्त ग्रुप बीड आणि सुराज्य सेना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.