अलहुदा उर्दु हायस्कूल येथे मा.आ. सय्यद सलीम यांच्या हस्ते ध्वजारोहण

बीड  (प्रतिनीधी) : शहरातील नूर एजुकेशनल एन्ड वेल्फेअर सोसायटी बीड द्वारा संचालित अलहुदा उर्दु प्रायमरी व हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त मा. आ. सय्यद सलीम यांच्या हस्ते सकाळी ७:५५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले,या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक वादळचे संपादक शेखर कुमार ,साय. दैनिक सिटीझन्सचे उपसंपादक शेख वसीम,माजी नगर सेवक शकील खान , जमील अहमद काद्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमास संस्थासचिव सय्यद इफ्तेखार अहमद ,वित्त सचिव शफिक सिद्दिक ,शालेय समिती सदस्य खुर्शीद काद्री व इतर मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.

   या बाबत सविस्तर असे कि अलहुदा उर्दू हाईस्कूल शहहिनशाह नगर बीड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त मा. आ. सय्यद सलीम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण कार्यक्रमानंतर अलहुदा उर्दू प्रार्थमिक व माध्यमिक शाळेचे विध्यार्थी ज्यांनी विविध स्पर्धेत आपल्या कलागुणांचे उत्तम प्रदर्शन केले यांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.या मध्ये कोल्हापूर येथे राज्यस्तरीय बेस्बाल स्पर्धेत सहभागी होणारे विद्यार्थी अब्दुल नईम रहीम  ,मिरान शफीक फारुकी ,शेख शोएब खालील सह प्रार्थमिक विद्यालयाचे अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक पठाण सिराज खान,प्रार्थमिकचे मुख्याध्यापक मोमीन जफर सह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक शेख मोइजोद्दिन आणि काजी वासेक यांनी संयुक्तपणे केले.

----------------------------------------------------------------------------------

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.