Add new comment

सिटीझनचे उपसंपादक शेख तालेब यांना पितृशोक

सिटीझनचे उपसंपादक शेख तालेब
यांना पितृशोक 

बीड दि.24 ( प्रतिनिधी ) येथील  सायं दै. बीड सिटीझनचे उपसंपादक शेख तालेब यांचे वडील तथा जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त चालक शेख अब्दुल बासिद यांचे शुक्रवार दि.24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता  अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते. शनिवार दि. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता तकीया मस्जिद कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे.

बीड शहरातील शहेंशाह नगर येथील अब्दुल बासिद हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले , सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. शेख कुटुंबीयांच्या दुःखात सिटीझन परिवार  सहभागी आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.