Add new comment

बीडमध्ये अजितदादांची सभा होणारच - धनंजय मुंडे

बीडमध्ये अजितदादांची सभा होणारच - धनंजय मुंडे 

बीड दि.19 ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची दिनांक 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा होणारच आहे असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून स्पष्ट केले आहे. दरम्यान सकाळपासून माध्यमांमध्ये अजित पवारांची बीडची सभा रद्द झाल्याचे वृत्त येत आहे . त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करून अजित पवार यांची बीड मधील 27 ऑगस्ट रोजी सभा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या सभेला अजितदादांसह पक्षातील अन्य वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत.ही सभा रद्द झाल्याबाबत माध्यमातून येणाऱ्या बातम्या चुकीच्या असून माध्यम प्रतिनिधींनी खात्री करावी,सभेबद्दलच्या चुकीच्या व निराधार बातम्या देऊ नये  असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.