Add new comment

आ. संदीप क्षीरसागर शरद पवारांसोबतच

आ. संदीप क्षीरसागर शरद पवारांसोबतच 

बीड दि.2 ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे - फडणवीस सरकार मध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत अन्य नऊ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर तीस ते पस्तीस आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा अजितदादा पवार यांनी केला आहे.त्या पार्श्वभूमीवर बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीपभैय्या क्षीरसागर कोणासोबत ? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र या संदर्भात आमदार संदीपभैय्या क्षीरसागर यांनी स्वतः च्या फेसबुक पेजवरून '' सदैव साहेबांसोबतच...''  अशी पोस्ट करून आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.