Add new comment

बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची शिवसेनेतुन हकालपट्टी

बीड जिल्हा संपर्क प्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची शिवसेनेतुन हकालपट्टी 

मुंबई, दि. १८ (प्रतिनिधी) - बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आली आहे. दरम्यान बीड शहरात गुरुवारी सायंकाळी महाप्रबोधन यात्रेच्या नियोजित कार्यक्रम स्थळी राडा झाला होता. शिवसेना ( उद्धव बाळासाहेबठाकरे ) पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्यासमोरच शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव व इतरांमध्ये वाद झाला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे  ) पक्षाकडून झालेल्या कारवाईने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.