Add new comment

भाजप नेते शेख इरशादभाई यांना पितृशोक

भाजप नेते शेख इरशादभाई 
यांना पितृशोक 

बीड दि.3 ( प्रतिनिधी ) भाजप नेते शेख इरशादभाई यांचे वडील शेख अब्दुल रज्जाक भंगारवाले ( रा. बालेपीर ) यांचे सोमवारी रात्री 8 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 86 वर्षांचे होते. मंगळवार दि.4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता बालेपीर दर्गाह परिसरातील कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळात त्यांनी चालक म्हणून अनेक वर्षे सेवा बजावून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात सहा मुले, पाच मुली , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. शेख कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.