Add new comment

राज्यात शनिवार , रविवार पूर्ण लॉकडाऊन

मुंबई - राज्यात आता शनिवारी आणि रविवारी पुर्णपणे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 8 पासून सोमवारी सकाळी 7 पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. नाईट कर्फ्यु लागू करण्यात आला असून मास्क लावणं आणि नियम पाळणं बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना ही माहिती दिली. राज्यात विकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सदरील निर्बंध हे 30 एप्रिल पर्यंत असणार आहेत. सार्वजनिक वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. आर्थिक परिस्थितीचा विचार करून हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले.

Attachments area

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.