Add new comment

बीड जिल्ह्यातील शाळा आता 31 मार्च पर्यंत बंद - जिल्हाधिकारी

बीड जिल्ह्यातील शाळा 31 मार्चपर्यंत बंद

बीड दि.10 ( प्रतिनिधी ) कोरोनाचा वाढत्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दहावी आणि बारावी वगळता 5 वी ते 9 वी आणि 11 वीचे वर्ग दहा मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी यापूर्वीच दिले होते. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील सर्व शाळा ( दहावी ,बारावी वर्ग वगळून ) दि.31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज दि. 10 मार्च रोजी काढले आहेत. 

बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज दि.10 मार्च रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की,  कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळा दिनांक 31 मार्च 2021पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामधून 10 वी  आणि 12 वीचे  वर्ग वगळण्यात आले आहेत. पाचवी, सहावी, सातवी, आठवी , नववी आणि अकरावीचे वर्ग बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.