Add new comment

दर्पणकार कै.बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, जिल्हा माहिती कार्यालय बीड येथे दर्पण दिन साजरा

बीड, (प्रतिनिधी):-दर्पणकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून  दर्पण दिननिमित्त जिल्हा माहिती कार्यालय बीड येथे त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. कै.बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या नियतकालिकाच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांच्या स्मृतीसाठी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्हयात ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने आजचा ”दर्पण दिन” कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.या निमित्त्याने जिल्ह्यातील सर्व पञकार बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
     जिल्हा माहिती कार्यालयात आज माहिती अधिकारी किरण वाघ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला . यावेळेस कार्यालयातील पर्यवेक्षक ना. गो. पुठ्ठेवाड, श्रीमती इंदुबाई गावडे, प्रचंड सोळंके, गजानन शिंदे, भागवत गायकवाड ,दीपक पवार , छगन कांडेकर, श्रीमती लता कारंडे, सावता गुंजाळ आदी उपस्थितांनी प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.