Add new comment
ऊसतोड मजूराच्या आत्महत्येप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी, मुकादमासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ऊसतोड मजूराच्या आत्महत्येप्रकरणी दोन पोलीस कर्मचारी, मुकादमासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बीड दि.26 ( प्रतिनिधी ) ऊसतोडणीसाठी जात नसल्याने मुकादम आणि पोलिसांनी मारहाण केल्याने गेवराई तालुक्यातील एरंडगाव येथील एका ऊसतोड मजुराने आत्महत्या केल्याची घटना काल घडली होती. नातेवाईक आणि गावकऱ्यांनी शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात ठिय्या मांडून मुकादम व पोलिसांवर गुन्हा नोंद केला तरच मृतदेह ताब्यात घेण्याची भूमीका त्यांनी घेतली होती. अखेर आज दुपारी ऊसतोड मजूर आसाराम सखाराम कवठेकर यांच्या आत्महत्येप्रकरणी भाऊ किसन कवठेकर यांच्या फिर्यादीवरून मुकादम बाळू उर्फ गणेश दत्ता गिरी, विकास दत्ता गिरी, सचिन दत्ता गिरी , ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी जरे , पोलीस कर्मचारी दुधाने व अन्य दोघांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात कलम 306, 365, 323, 504 , 506 , 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
