लाइव न्यूज़
Add new comment
मांजरसुंबा घाटात इंधनाच्या टँकरला भिषण आग ; एक ठार

नेकनूर दि.20 ( सिटीझन ) मांजरसुंबा घाटामध्ये आज सकाळी इंधन घेऊन येणारा ट्रक अचानक पेटला. टँकरने पेट घेतल्यानंतर तो पलटी झाला. काही कळण्याच्या आतच पूर्ण टॅंकर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. टँकरमध्ये इंधन असल्याने काही क्षणातच मोठा आगडोंब झाला. धुराचे लोळ उठले, रस्त्यावरून जाणारी येणारी वाहने जागच्या जागी थांबली. तातडीने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत टँकर पूर्णपणे जळून खाक झाला होता.या आगीमध्ये टँकर चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती येत असून अन्य एक जण जखमी झाल्याचे समजते.
