लाइव न्यूज़
Add new comment
बीडमध्ये तिघांवर हल्ला ; गंभीर जखमी

बीड दि.18 ( सिटीझन ) शहरातील मोमीनपुरा भागातील पुलावर अज्ञात चौघांनी किरकोळ कारणावरून तिघांवर शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेख अामेर अनिस ( वय 28 ) , शेख शकील कट्टु ( 30 ) आणि शेख अहेमद कट्टु तिघे रा. मोमीन पुरा बीड हे जखमी झाले आहेत. यामध्ये अामेरच्या डोकयावर गंभीर वार अाहे.शकीलच्या पायावर वस्तरा मारलेला अाहे तर अहेमदचा कानाला।गंभीर दुखापत झाली आहे. तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी पेठ बीड पोलीस दाखल झाले होते. सदर हल्ल्याचे कारण मात्र समजू शकले नाही.
