Add new comment

बीड जिल्ह्याची चिंता वाढलेलीच ; आज आणखी दोघे पॉझिटिव्ह

बीड दि.18 ( सिटीझन ) बीड जिल्ह्याची चिंता आणखी वाढतच जात असून आज पुन्हा दोघे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरोग्य प्रशासनाकडून  पाठविण्यात आलेले 77 पैकी 2 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर आणखी दोन व्यक्तीचे अहवालात काहीच निष्कर्ष निघालेला नाही. त्यामुळे त्यांचे स्वॅब पुन्हा 48 तासानंतर घेतले जाणार आहेत. तर एकूण 73 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 
बीड जिल्ह्यात आज आढळलेले 2 आणि कालपर्यंतचे 9 असे एकूण 11 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. आजचे दोन्ही पॉझिटीव्ह रिपोर्ट आलेले रुग्ण हे माजलगाव तालुक्यातील असुम एकाचे वय 65 तर दुसऱ्याचे वय 18 असल्याचे समजते. नागरीकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घरातच सुरक्षित राहावे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.