Add new comment

व्यापाऱ्यांवर हात उचलणाऱ्या पीआय.मोरेंची औरंगाबादला बदली

वासुदेव मोरे यांच्यासह 
ट्रॅफिक पीआय तळेकर यांची बदली 

बीड दि.16 ( सिटीझन ) शहरातील सुभाष रोड , आदर्श मार्केट येथील व्यापाऱ्यांना मारहाण करणाऱ्या शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांची औरंगाबाद येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. दरम्यान मोरे यांच्या जागी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोनि. सुनील बिर्ला यांच्याकडे अतिरिक्त चार्ज देण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतूक शाखेचे पोनि. तळेकर यांनाही औरंगाबाद येथे संलग्न करण्यात आले असून आता वाहतूक शाखेचा अतिरिक्त चार्ज पेठ बीड ठाण्याचे पोनि. विश्वास पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याबाबतचे अधिकृत आदेश काढले आहेत. दरम्यान मोरे यांच्याविषयी अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. आ.विनायक मेटे यांनी तर थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती तर आ. संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. व्यापाऱ्यांमधूनही मोरे यांच्याविषयी प्रचंड नाराजी होती. तर तळेकर यांनी लॉकडाऊनच्या काळात रुग्ण घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई केली होती अशी तक्रार वरिष्ठांकडे झाली होती. त्यातूनच तळेकर यांना औरंगाबादला संलग्न केल्याचे समजते. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.