लाइव न्यूज़
Add new comment
बीड जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; नागरिकांनो काळजी घ्या

बीड दि.16 ( सिटीझन ) ज्या गोष्टीची भीती होती आज तेच झाले. जिल्ह्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली. एक रुग्ण माजलगाव तालुक्यातील तर दुसरा गेवराई तालुक्यातील असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे. दोघेही बाहेरून आल्याचे समजते. दरम्यान दोन रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून जावू नये. घरीच राहावे आणि सुरक्षित राहावे. काळजी घ्यावी असे अवाहन करण्यात आले आहे.
