Add new comment

बीडमध्ये तंबाखूच्या गोडाऊनवर एलसीबीची धाड, 250 पोते सापडले

बीड दि.16 ( सिटीझन ) शहरातील इमामपूर रोडवर आज दुपारी एलसीबीच्या टीमने तंबाखूचा गोडावूनवर धाड टाकली.यावेळी त्या ठिकाणी जवळपास अडीचशे पोते तंबाखूचा साठा आढळून आल्याचे समजते. सदरील साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.  यासंदर्भात एलसीबीकडे विचारणा केली असता कारवाई झाल्याचे सांगितले मात्र अधिक माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली.

बीड शहरातील इमामपूर रोड भागात एका गोडाऊनमध्ये तंबाखूचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आज दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने या ठिकाणी कारवाई केली असता गोडाउनमध्ये जवळपास 250 पोते तंबाखू आढळून आली. टेम्पो मागवून साठा पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो साठा पेठ बीड पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. दरम्यान सदरील तंबाखू ही सुटी विक्री करण्याची असून संबंधित मालकाने मात्र हा माल फेब्रुवारीमध्ये मागवला होता असे सांगून पोलिसांना जीएसटी बिलासह पावत्या दाखवल्याचे समजते. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.