Add new comment

गेवराईतील बागपिंपळगावमध्ये अडकलेले मजूर अमरावतीकडे रवाना

बीड दि.10 ( सिटीझन ) गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथे अमरावती येथील काही मजूर लॉकडाऊनमुळे अडकले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित मजूरांना एका खाजगी वाहनातून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आले.

बीड जिल्ह्यातील  बागपिंपळगाव येथे अडकून पडलेल्या मजुरांना रविवारी रात्री नियमानुसार अमरावतीकडे रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशाने व  गेवराईचे तहसीलदार गायकवाड , नायब तहसीलदार अभय जोशी, बागपिंपळगाव सज्जाचे तलाठी बाळासाहेब पकाले, कोतवाल अशोक बेलनुर यांच्या प्रयत्नाने त्यांना आदेशासह गेवराईमधून गाडी करून  अमरावती  ( ता.धारणी ) या ठिकाणी रवाना करण्यात आले. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.