Add new comment
तळीरामांचा प्रताप; गोदाम फोडून दारुचे बॉक्स पळवले
राज्यात लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद असल्याने तळीरामांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे दारुच्या दुकानात चोरी झाल्याच्या बातम्या येत असतानाच नाशिकमधील तळीरामांनी तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचं गोदामच फोडून तीन लाख रुपये किंमतीची दारू पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नाशिक: राज्यात लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद असल्याने तळीरामांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे दारुच्या दुकानात चोरी झाल्याच्या बातम्या येत असतानाच नाशिकमधील तळीरामांनी तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचं गोदामच फोडून तीन लाख रुपये किंमतीची दारू पळवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचं एक मजली गोदाम आहे. या गोदामात बेकायदेशीर आणि विनापरवनागी विक्री करण्यात येत असलेल्या दारूचे बॉक्स ठेवण्यात आले आहेत. शहरातील सर्वच दुकाने बंद असल्याने काही चोरट्यांनी या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोदामालाच टार्गेट केलं आहे. चोरट्यांनी हे गोदाम फोडून गोदामातील सुमारे तीन लाख रुपयाहून अधिक किंमतीच्या दारुचे बॉक्स लंपास केले. चोरट्यांनी एक दोन नव्हे तर सुमारे ६८ बॉक्स लंपास केले होते.
