लाइव न्यूज़
Add new comment
छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला
Beed Citizen | Updated: May 11, 2018 - 4:24pm
मुंबई, (प्रतिनिधी):- जामिनावर सुटलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची ’सिल्व्हर ओक’ या पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली.
जामिनावर जेलबाहेर आल्यानंतर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची ही पहिलीच भेट होती. जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवारांचा आला, असंही भुजबळांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं होतं.
भुजबळ आज सकाळी आपल्या सांताक्रूझमधील निवासस्थानावरुन पवारांच्या भेटीसाठी गेले.
या भेटीत राजकीय नाही तर प्रकृतीसंदर्भात चर्चा झाली. शरद पवारांनी वडीलकीच्या नात्याने विचारपूस केली. तसंच विशेष काळजी घ्या, असंही पवारांनी सांगितल्याचं भुजबळ म्हणाले.
