लाइव न्यूज़
Add new comment
अंबाजोगाईत भाजप नगरसेवक कोपलेंवर सशस्त्र हल्ला

अंबाजोगाई, (प्रतिनिधी):- येथील भाजपचे नगरसेवक कमलाकर कोपले यांच्यावर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला केल्याची घटना आज दुपारी घडली. हल्ल्यामध्ये कोपले हे गंभीररित्या जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने अंबाजोगाईसह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच आ.संगीता ठोंबरे अंबाजोगाईकडे रवाना झाल्या आहेत.
अंबाजोगाई येथील भाजप नगरसेवक कमलाकर कोपले हे तेथील कार्यकर्ते दिलीप काळे यांच्या घरी बसले होते. बाहेर येताच अचानक आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोपले यांच्यावर दंडूके आणि गजाने हल्ला चढविला. त्यामध्ये कोपले हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावरुन आ.आर.टी.देशमुख निघून गेल्यानंतर हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. कोपले यांच्यावर कोणत्या कारणामुळे हल्ला झाला याची माहिती मिळू शकली नाही. मात्र अंबा कारखाना परिसरात कोपले यांचा एका गटासोबत वाद झाला होता. त्याचाही संदर्भ हल्ल्याशी असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.