Add new comment

बीडमधील बशिरगंज चौकात आज मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्यावतीने सभा

बीड, (प्रतिनिधी):- तीन तलाक प्रश्‍नी दि.७ एप्रिल रोजी होणार्‍या मुस्लिम महिला मेळाव्याच्या पार्श्‍वभुमीवर आज दि.५ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्यावतीने कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत बोर्डाचे सदस्य हिंगोली येथील मौलाना मुफ्ती जुनेदुल रहेमान व परभणी येथील मौलाना रफीयोद्दीन अशरफी मार्गदर्शन करणार आहेत.
बीड येथे आज रात्री ८.३० वाजता बशिरगंज चौक येथे ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्यावतीने कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन तलाक प्रश्‍नी दि.७ एप्रिल रोजी मुस्लिम महिलांचा मेळावा आडत मार्केटजवळील मैदानात होत आहे. त्या पार्श्‍वभुमीवर जनजागृती करण्यासाठी आज रात्री ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डच्या सदस्यांची कॉर्नर सभा होत आहे. या सभेस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड बीड कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.