Add new comment

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस मारहान

शिरूर, (प्रतिनिधी):- घराचा दरवाजा उघडण्यास एवढा वेळ लागतोच कसा? असा सवाल उपस्थित करून चारित्र्याच्या संशायावरून पत्नीला मारहान केल्याची घटना तालुक्यातील खोकरमोहा येथे घडली आहे. पतीच्या मारहानीला कंटाळून सुमित्रा महारुद्र नागरगोजे यांनी पती महारुद्र नागरगोजे याच्या विरोधात शिरूर ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. सोमवारी रात्री सुमित्रा यांचे सासु-सासरे हे सप्ताहाच्या निमित्ताने तागडगांव येथे गेले होते. रात्री १०:३० च्या दरम्यान पती महारुद्र नागरगोजे हे घरी आले असता दरवाजा उघडण्यास एवढा वेळ कसा लागतो ? तुझी वर्तणूक चांगली नाही म्हणत सुमित्रा यांना मारहान करण्यास सुरवात केली. लाकडी बांबुने मारहान करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यावरून सुमित्रा यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली असून सहाय्यक फौजदार भंडारी तपास करीत आहेत. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.