लाइव न्यूज़
Add new comment
पत्रकार महादेव गायकवाड यांना मातृशोक

केज ( प्रतिनिधी ) तालुक्यातील देवगांव येथील त्रिवेणीबाई दशरथ गायकवाड वय ९० वर्षे यांचे दि.६ मार्च मंगळवार रोजी सकाळी सात वाजता दु:खद निधन झाले आहे. त्या गेल्या पंधरा वर्षापासून दमा या आजाराने त्रस्त होत्या त्यांच्यावर केज, माजलगाव, बीड येथीेल रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर कुठलेही इलाज काम करत नसल्याने शेवटी दि.६ सहा मार्च मंगळवारी रोजी सकाळी सात वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. त्रिवेणी आक्का या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती,दोन,मुले,सुना,तिन मुली,एक भाऊ एक बहीण नातांवडे असा मोठा परीवार आहे. पत्रकार महादेव गायकवाड यांच्या त्या आई होत्या. गायकवाड परिवाराच्या दु:खात सिटीझन परिवार सहभागी आहे.