Add new comment

सर्पदंश; पैशाअभावी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

गेवराई (प्रतिनिधी) तालुक्यातील उक्कडपिंप्री येथील एका ४० वर्षीय महिलेला शेतात तुर गोळा करत असतांना सर्पदंश झाला होता. या महिलेचा उपचारासाठी बीड जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेला पुढील उपचारासाठी बीडवरून औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. एक महिना या महिलेवर उपचार सुरू होते. मात्र पैसे संपल्याने महिलेच्या नातेवाइकांनी त्या महिलेला पुन्हा बीड मध्ये उपचारासाठी आणत असतांना रस्त्यातच या महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे.
गेवराई तालुक्यातील उक्कडपिंप्री येथील आशा मुकूंद पालवे (४०) या महिलेला २१ जानेवारी रोजी शेतातील तुर गोळा करत असतांना सर्पदंश झाला होता. या महिलेला तात्काळ उपचारासाठी बीड जिल्हा रूग्णालयात आणले होते. महिलेची तब्येत बिघडल्याने तिला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील एका नामांकीत दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. एक महिना या महिलेवर त्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तिची प्रकृती सुधारली नाही. उपचारासाठी पैसे अपुरे पडले. पैसे संपल्यामुळे नातेवाईकांनी आशा पालवे यांना पुन्हा बीडकडे उपचारासाठी हलवण्याचे प्रयत्न केले. मात्र रस्त्यातच आशा पालवेंचा मृत्यू झाला आहे. या घटनेला नेमके कोण जिम्मेदार आहे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.