Add new comment

जेसीबीने वाळु उपसा; दोघांविरूध्द गुन्हा दाखल

गेवराई (प्रतिनिधी) सिंदफणा नदी पात्रातून विनापरवाना जेसीबीने वाळु उपसा करणार्‍या दोघांविरूध्द गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी उपस्याच्या साहित्यासह १ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गेवराई तालुक्यातील एरंडगाव येथील सिंदफणा नदीच्या पात्रातून विनापरवाना वाळु उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. छापा टाकण्यासाठी पोलिस गेले असता उपस्याचे साहित्य सोडून दोघेजण पळून गेले. याप्रकरणी बप्पासाहेब नारायण लाखे (रा.एरंडगाव) व बाळासाहेब अर्जून डांगे (रा.टाकळगाव) या दोघांविरूध्द गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोहेकॉ इंगोले करीत आहेत.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.